Talathi Bharti 2023 Online Mock Test : तलाठी भरती 2023 महत्त्वाचे प्रश्नोत्तरे
तलाठी भरती 2023 ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 25 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या तलाठी भरती 2023 मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावासाठी NaukriInsider.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे.
तलाठी भरती व इतर सरळसेवा परीक्षेला विचारलेले महत्त्वाचे प्रश्न
Talathi Bharti 2023 Online Mock Test : तलाठी भरती 2023 महत्त्वाचे प्रश्नोत्तरे
प्रश्न १ : मुळशी येथे शेतकर्यांनी केलेल्या सत्याग्रहाचे नेतृत्त्व कोणी केले ?
१) सेनापती बापट
२) नानासाहेब पेशवे
३) तात्या टोपे
४) न्या.रानडे
उत्तर : सेनापती बापट
प्रश्न २ : ‘ब्राम्हो समाजाची’ स्थापना कोणी केली ?
१) दादाभाई नौरोजी
२) रविंद्रनाथ टागोर
३) स्वामी विवेकानंद
४) राजा राममोहन राय
उत्तर : राजा राममोहन राय
प्रश्न ३ : स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते ?
१) सी.राजगोपालचारी
२) न्या.गोखले
३) सरदार वल्लभभाई पटेल
४) तेजबहादूर सप्रू
उत्तर : सरदार वल्लभभाई पटेल
प्रश्न ४ : ‘माझी जन्मठेप’ हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे ?
१) नेताजी सुभाषचंद्र बोस
२) लोकमान्य टिळक
३) महात्मा फुले
४) स्वातंत्र्यवीर सावरकर
उत्तर : स्वातंत्र्यवीर सावरकर
प्रश्न ५ : स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली ?
१) न्या.गोखले
२) न्या.रानडे
३) महात्मा फुले
४) डॉ.बाबासाहेब आंबेडकर
उत्तर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर
प्रश्न ६ : छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ?
१) शिवनेरी
२) सिंहगड
३) पुरंदर
४) रायगड
उत्तर : पुरंदर
प्रश्न ७ : ‘भारुड’ हा काव्य प्रकार कोणामुळे ओळखला जातो ?
१) संत एकनाथ
२) संत ज्ञानेश्वर
३) संत तुकाराम
४) संत तुकडोजी महाराज
उत्तर : संत एकनाथ
प्रश्न ८ : राष्ट्राचा प्रथम नागरिक म्हणून कोणास संबोधले जाते ?
१) पंतप्रधान
२) राष्ट्रपती
३) सरन्यायाधीश
४) मुख्यमंत्री
उत्तर : राष्ट्रपती
प्रश्न ९ : खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात ?
१) राज्यघटनेचा सरनामा
२) मूलभूत कर्तव्ये
३) एकेरी नागरिकत्त्व
४) धर्मनिरपेक्षता
उत्तर : राज्यघटनेचा सरनामा
प्रश्न १० : राष्ट्रपतींना घटनेच्या कोणत्या कलमानुसार ‘माफीचा’ अधिकार आहे ?
१) कलम 42
२) कलम 52
३) कलम 62
४) कलम 72
उत्तर : कलम 72
प्रश्न ११ : भारताचा प्रथम नागरिक व भारतातील सर्वश्रेष्ठ कार्यकारी अधिकारी कोण असतात ?
१) पंतप्रधान
२) उपराष्ट्रपती
३) राष्ट्रपती
४) राज्यपाल
उत्तर : राष्ट्रपती
प्रश्न १२ : भारताच्या राष्ट्रपतीपदाची पहिली निवडणूक कधी पार पडली ?
१) 16 ऑगस्ट 1948
२) 6 मे 1950
३) 6 मे 1951
४) 6 मे 1952
उत्तर : 6 मे 1952
प्रश्न १३ : राष्ट्रपती पदाची निवडणूक लढविण्यास पात्र होण्यासाठी उमेदवाराचे वय किती असणे आवश्यक आहे ?
१) 25 वर्ष
२) 30 वर्ष
३) 50 वर्ष
४) 35 वर्ष
उत्तर : 35 वर्ष
प्रश्न १४ : महाराष्ट्रातील विधानसभेची सदस्य संख्या किती आहे ?
१) 288
२) 278
३) 280
४) 300
उत्तर : 288
प्रश्न १५ : कॉपर या मुलद्रव्याचे रासायनिक नाव काय आहे ?
१) Co
२) Ca
३) Cu
४) Cl
उत्तर : Cu
प्रश्न १६ : विमानाचा शोध खालीलपैकी कोणी लावला आहे ?
१) एडिसन
२) जेम्स वॅट
३) राइट बंधु
४) गॅलीलिओ
उत्तर : राइट बंधु
प्रश्न १७ : भूकंपमापक यंत्राला शास्त्रीय नाव काय आहे ?
१) स्पॅरोग्राफ
२) ग्राफोमीटर
३) रेडियो मायक्रोमीटर
४) सिस्मोग्राफ
उत्तर : सिस्मोग्राफ
प्रश्न १८ : पाण्याची घनता…………. डिग्री सेंटीग्रेड वर सर्वाधिक असते ?
१) 0 डिग्री सेंटीग्रेड
२) 4 डिग्री सेंटीग्रेड
३) 10 डिग्री सेंटीग्रेड
४) 100 डिग्री सेंटीग्रेड
उत्तर : 4 डिग्री सेंटीग्रेड
प्रश्न १९ : सोनार यंत्रणेच्या वापराने वैद्यकशास्त्रात कोणते तंत्र निर्माण झाले ?
१) क्ष किरण
२) लेझर
३) सोनोग्राफी
४) किरणोत्सरी
उत्तर : सोनोग्राफी
प्रश्न २० : 20 डिग्री तापमानावर ध्वनीचा हवेतील वेग किती मीटर/सेकंद असतो ?
१) 343
२) 430
३) 300
४) 34
उत्तर : 343
प्रश्न २१ : खालीलपैकी अष्टविनायकाचे कोणते ठिकाण अहमदनगर जिल्ह्यात आहे ?
१) मोरगाव
२) सिद्धटेक
३) ओझर
४) रांजणगाव
उत्तर : सिद्धटेक
प्रश्न २२ : गडचिरोली,चंद्रपुर,यवतमाळ,नांदेड या जिल्हयांची सरहद्द कोणत्या राज्याला भिडलेली आहे ?
१) मध्यप्रदेश
२) गुजरात
३) कर्नाटक
४) तेलंगणा
उत्तर : तेलंगणा
प्रश्न २३ : महाराष्ट्रास सुमारे किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे ?
१) 740 किमी
२) 1000 किमी
३) 720 किमी
४) 700 किमी
उत्तर : 720 किमी
प्रश्न २४ : खालीलपैकी कोणत्या प्राण्यास महाराष्ट्राचा राज्यप्राणी म्हणून ओळखले जाते ?
१) हरिण
२) वाघ
३) शेकरू
४) गवा
उत्तर : शेकरू
प्रश्न २५ : पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ?
१) सांगली
२) कोल्हापूर
३) रत्नागिरी
४) सातारा
उत्तर : कोल्हापूर
Talathi Bharti Important Questions : तलाठी भरती 2023 महत्त्वाचे प्रश्नोत्तरे
तलाठी भरती 2023 ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 25 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या तलाठी भरती 2023 मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावासाठी NaukriInsider.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे.
Talathi Bharti Important Questions
Talathi bharti 2019 maharashtra question paper
talathi bharti online mock test
Talathi Bharti 2023 Question Paper PDF Download
Talathi Bharti 2023 Online Mock Test