Talathi Bharti Important Questions : तलाठी भरती 2023 महत्त्वाचे प्रश्नोत्तरे
तलाठी भरती 2023 ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 25 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या तलाठी भरती 2023 मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावासाठी NaukriInsider.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे.
तलाठी भरती व इतर सरळसेवा परीक्षेला विचारलेले महत्त्वाचे प्रश्न
प्रश्न १ : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकिंगसाठी परवाना दिलेली सार्वजनिक क्षेत्रातील पहिली बँक कोणती आहे ?
१) पंजाब नॅशनल बँक
२) देना बँक
३) कॅनरा बँक
४) सिंडीकेट बँक
उत्तर : पंजाब नॅशनल बँक
प्रश्न २ : ‘गरीबी हटाव’ ही प्रसिद्ध घोषणा ……… या भारतीय पंतप्रधानांनी केली ?
१) पंडित नेहरू
२) इंदिरा गांधी
३) राजीव गांधी
४) लाल बहादुरशास्त्री
उत्तर : इंदिरा गांधी
प्रश्न ३ : भारतीय राज्यघटनेनुसार राष्ट्रपतींना असलेला दयेचा अधिकार ……….. कलमानुसार आहे ?
१) कलम 52
२) कलम 48
३) कलम 78
४) कलम 72
उत्तर : कलम 72
प्रश्न ४ : अकबराच्या महसूल व्यवस्थेचा प्रमुख खालीलपैकी कोण होता ?
१) तोडरमल
२) बिरबल
३) फैज
४) राजा मानसिंग
उत्तर : तोडरमल
प्रश्न ५ : महात्मा गांधी यांची दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे ?
१) असहकार चळवळ
२) भारत छोडो आंदोलन
३) सविनय कायदेभंग
४) खिलाफत चळवळ
उत्तर : सविनय कायदेभंग
प्रश्न ६ : ‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’ हे घोषवाक्य कोणाशी संबंधित आहे ?
१) खानदेशी एज्यूकेशन सोसायटी
२) रयत शिक्षण संस्था
३) मराठा विद्या प्रसारक मंडळ
४) गोखले एज्युकेशन सोसायटी
उत्तर : रयत शिक्षण संस्था
प्रश्न ७ : जिवंतपणी आपली प्रेतयात्रा कोणाला पाहावी लागली होती ?
१) महात्मा फुले
२) लोकमान्य टिळक
३) लोकहितवादी
४) गो.ग.आगरकर
उत्तर : गो.ग.आगरकर
प्रश्न ८ : संत चोखामेळा यांची समाधी ……….. येथे आहे ?
१) शेगाव
२) औदुंबर
३) मंगळवेढा
४) सासवड
उत्तर : मंगळवेढा
प्रश्न ९ : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या कितव्या वर्षापर्यंत पदावर राहू शकतात ?
१) 58 वर्ष
२) 60 वर्ष
३) 62 वर्ष
४) 65 वर्ष
उत्तर : 65 वर्षे
प्रश्न १० : इंदिरा गांधींनी राष्ट्रास अर्पण केलेले ‘आनंदवन’ हे नेहरू कुटुंबियांचे निवासस्थान ………. येथे आहे ?
१) प्रयागराज ( अलाहाबाद )
२) श्रीनगर
३) नवी दिल्ली
४) रायबरेली
उत्तर : प्रयागराज ( अलाहाबाद )
प्रश्न ११ : कमाल नफा मिळविणे हा ……….. अर्थव्यवस्थेतील उत्पादकांचा मुख्य हेतु आहे ?
१) समाजवादी
२) मिश्र
३) भांडवलशाही
४) वरीलपैकी नाही
उत्तर : भांडवलशाही
प्रश्न १२ : आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णयाचे स्वातंत्र्य म्हणजे काय ?
१) खाजगीकरण
२) उदारीकरण
३) जगतिकीकरण
४) निर्गुंतवणुकीकरण
उत्तर : उदारीकरण
प्रश्न १३ : मसाल्यामध्ये वापरली जाणारी दालचीनी म्हणजे …………. या झाडाची साली होय ?
१) सिनॅमन
२) पाईन
३) सिंकोना
४) मॅंग्रूव्ह
उत्तर : सिनॅमन
प्रश्न १४ : पाण्याचा रेणु हा हायड्रोजनचे ……… अणु व ऑक्सीजनचा 1 अणु मिळून तयार होतो ?
१) 1 अणु
२) 2 अणु
३) 3 अणु
४) 4 अणु
उत्तर : 2 अणु
प्रश्न १५ : स्ट्रीट चाइल्ड क्रिकेट वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाचा सदिच्छा दूत म्हणून खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आली होती ?
१) सौरव गांगुली
२) दीप्ती शर्मा
३) स्मृती मंधना
४) मिथाली राज
उत्तर : मिथाली राज
प्रश्न १६ : महाराष्ट्रामध्ये पितळखोरे लेणी कोणत्या ठिकाणी स्थित आहे ?
१) पुणे
२) नाशिक
३) चंद्रपूर
४) छ.संभाजीनगर
उत्तर : छ.संभाजीनगर
प्रश्न १७ : जगातील सर्वात उंच पुतळा, ‘एकतेचा पुतळा’ (statue of unity) गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील ………. येथे स्थित आहे ?
१) वेगडिया
२) भूमालीया
३) केवाडिया
४) गडकोई
उत्तर : केवाडिया
प्रश्न १९ : भारताचे पहिले ‘दागिन्यांचे उद्यान’ (ज्वेलरी पार्क) येथे स्थापित आहे ?
१) दिल्ली
२) नाशिक
३) नवी मुंबई
४) नागपुर
उत्तर : नवी मुंबई
प्रश्न २० : महाराष्ट्रातील दुसरे मेगा फूड पार्क हे औरंगाबाद जिल्ह्याच्या पैठण तालुक्यातील वाहेगाव आणि ……….. गावामध्ये आहे ?
१) धनगाव
२) ढोरकिन
३) दिन्नापुर
४) एक्टूनी
उत्तर : धनगाव
प्रश्न २१ : भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची नेमणूक खालीलपैकी कोण करते ?
१) वित्तमंत्री
२) संसद
३) राष्ट्रपती
४) पंतप्रधान
उत्तर : राष्ट्रपती
प्रश्न २२ : खालीलपैकी कोण एक महाराष्ट्र राज्यामधील पहिले वारकरी संत होते ?
१) संत तुकाराम
२) संत ज्ञानेश्वर
३) संत नामदेव
४) संत मुक्ताबाई
उत्तर : संत ज्ञानेश्वर
प्रश्न २३ : दारणा धरण भारतामधील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ?
१) महाराष्ट्र
२) पश्चिम बंगाल
३) गुजरात
४) बिहार
उत्तर : महाराष्ट्र
प्रश्न २४ : 20 व्या शतकाच्या सुरूवातीला अभिनव भारत ही गुप्त क्रांतिकारी संघटना ……….. द्वारे महाराष्ट्रात सुरू करण्यात आली ?
१) निलकांत ब्रम्हचारी
२) अजित सिंग
३) लाला हरदयाळ
४) सावरकर बंधु
उत्तर : सावरकर बंधु
प्रश्न २५ : महाराष्ट्रातील पहिली सौरऊर्जा योजन कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?
१) कोल्हापूर
२) बीड
३) नांदेड
४) छ.संभाजीनगर
उत्तर : बीड
Talathi Bharti Important Questions : तलाठी भरती 2023 महत्त्वाचे प्रश्नोत्तरे
तलाठी भरती 2023 ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 25 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या तलाठी भरती 2023 मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावासाठी NaukriInsider.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे.
Talathi Bharti Important Questions
Talathi bharti 2019 maharashtra question paper
talathi bharti online mock test
Talathi Bharti 2023 Question Paper PDF Download