#04 Navi Mumbai Police Bharti 2021 Question Paper | नवी मुंबई पोलीस शिपाई भरती 2021 मधील प्रश्नपत्रिका | Maharashtra Police | Naukri Insider

Vaijinath Akhade
Vaijinath Akhade
7 Min Read

पोलीस भरती 2023 ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 25 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या पोलीस भरती 2023 मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावासाठी NaukriInsider.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. या प्रश्नसंच मध्ये  नवी मुंबई शिपाई पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले सामान्य ज्ञान प्रश्न आपण या संचामध्ये घेत आहोत.

Navi Mumbai Police Bharti 2021 Question Paper

1) महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते ?
a) विधानसभा
b) विधान परिषद
c) राजभवन
d) विधानसभा
उत्तर : विधान परिषद

2) ढगापासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्राला काय म्हणतात ?
a) क्लाऊड कम्प्युटिंग
b) क्लाऊड कंट्रोल
c) क्लाऊड इंजीनियरिंग
d) क्लाऊड सीडिंग
उत्तर : क्लाऊड सीडिंग

3) मराठीतील पहिले प्रवासवर्णन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या “माझा प्रवास” या पुस्तकाचे लेखक …………… हे होत.
a) पु .ल. देशपांडे
b) गोडसे भटजी
c) कुसुमाग्रज
d) वि. स. खांडेकर
उत्तर : गोडसे भटजी

4) महाराष्ट्र शासनातर्फे कोणता दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो ?
a) 22 सप्टेंबर
b) 20 सप्टेंबर
c) 28 सप्टेंबर
d) 25 सप्टेंबर
उत्तर : 28 सप्टेंबर

5) ‘चले जाव’ ठरावाचा मसुदा कोणी तयार केला ?
a) महात्मा गांधी
b) लालबहादूर शास्त्री
c) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
d) जवाहरलाल नेहरू
उत्तर : जवाहरलाल नेहरू

6) “पोलीस “हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचित समाविष्ट करण्यात आला आहे ?
a) केंद्र सूची
b) राज्य सूची
c) समवर्ती सूची
d) विशेष सूची
उत्तर : राज्य सूची

marathi naukri telegram

7) पिवळ्या फॉस्फरस पासून तांबडा फॉस्फरस तयार करताना कोणता उत्प्रेरक वापरतात ?
a) निकेल
b) हायड्रोजन
c) सोडियम
c) आयोडीन
उत्तर : आयोडीन

8) …………….. या व्हाईसरॉयच्या कारकिर्दीत इसवी सन 1911 ते 1912 मध्ये भारताची राजधानी कोलकत्याहून दिल्ली येथे नेण्यात आली .
a) लॉर्ड हार्डिंग
b) लॉर्ड डफ्रिन
c) लॉर्ड कर्झन
d) लॉर्ड डलहौसी
उत्तर : लॉर्ड हार्डिंग

9) जेव्हा दारे बंद असलेली कार उन्हात ठेवली जाते तेव्हा आतील तापमान वाढते यास कारणीभूत ठरणारी बाब कोणती ?
a) प्रदूषण
b) हरितगृह परिणाम
c) कार्बन-डाय-ऑक्साइड
d) वैश्विक उष्णता वाढ
उत्तर : हरितगृह परिणाम

10) जास्त उंचीवर कमी तापमानास पाणी उकळते, कारण तिथे असणाऱ्या हवेच्या दाबाचे प्रमाण ………….. असते.
a) जास्त
b) अधिक
c) अत्याधिक
d) कमी
उत्तर : कमी

11) मोटार वाहन कायदा 1988 अंतर्गत कलम 129 आपणाला काय सांगते .
a) वाहन चालवताना मोबाईल वापरू नये.
b) हेल्मेट परिधान केले पाहिजे
c) सीट बेल्ट लावलाच पाहिजे
d) वाहन चालवताना लायसन्स जवळ बाळगले पाहिजे
उत्तर : हेल्मेट परिधान केले पाहिजे

12) श्रीवर्धन येतील…. जातीची सुपारी महाराष्ट्रात सर्व दूर प्रसिद्ध आहे ?
a) मंगलम
b) रोठा
c) चिकणी
d) गोटू
उत्तर : रोठा

marathi naukri telegram

13) वाहन चालवताना गॉगलचा वापर केव्हा करू नये ?
a) डोंगरावरून प्रवास करताना
b) पावसाळ्यात प्रवास करताना
c) पुलावरून प्रवास करताना
d) बोगद्यातून प्रवास करताना
उत्तर : बोगद्यातून प्रवास करताना

14) E.B.D. चा पूर्ण अर्थ काय आहे ?
a) इलेक्ट्रॉनिक बोर्ड डेव्हलपमेंट
b) इलेक्ट्रॉनिक ब्रेक डिस्ट्रीब्यूशन
c) इलेक्ट्रिकल ब्रेक डिस्ट्रीब्यूशन
d) इलेक्ट्रॉनिक ब्रेक डेव्हलपमेंट
उत्तर : इलेक्ट्रॉनिक ब्रेक डिस्ट्रीब्यूशन

15) मोटार वाहन अधिनियम 1988 मधील कलम 113 हे कशाशी संबंधित आहे ?
a) वेग मर्यादा
b) वजन मर्यादा
c) पार्किंग
d) सिग्नल तोडणे
उत्तर : वजन मर्यादा

16) सावधान करणारी चिन्हे नेहमी कशी असतात.
a) वर्तुळात
b) त्रिकोणात
c) षटकोनात
d) चौकोनात
उत्तर : त्रिकोणात

17) भारतीय हवाई दलात लढाऊ वैमानिक( फायटर पायलट ) म्हणून निवड झालेल्या ………….. या महाराष्ट्रातील पहिल्या व देशातील दहाव्या महिला फायटर पायलट ठरल्या आहेत .
a) अर्चना कदम
b) अलका जोशी
c) जयश्री गायकवाड
d) अंतरा मेहता
उत्तर : अंतरा मेहता

18) महाराष्ट्र राज्यातील 50 वे अभयारण्य कान्हाळगाव’ हे घोषित करण्यात आले असून ते ……………….. या जिल्ह्यात आहे .
a) भंडारा
b) चंद्रपूर
c) अमरावती
d) कोल्हापूर
उत्तर : चंद्रपूर

marathi naukri telegram

19) “प्रकाश वर्ष” हे काय आहे ?
a) वीज मंडळाच्या मुख्यालयाचे नाव
b) ताऱ्यामधील अंतर मोजण्याचे एकक
c) भारतातील प्रकाश राजाने सुरू केलेली वर्ष गणना
d) ताऱ्यांमधील वेळ मोजण्याचे एकक
उत्तर : ताऱ्यामधील अंतर मोजण्याचे एकक

20) सन 2020 च्या उस्मानाबाद येथे संपन्न झालेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद …………….. यांनी भूषविले.
a) लक्ष्मीकांत देशमुख
b) डॉ.अक्षय कुमार काळे
c) फादर फ्रान्सीस दीब्रिटो
d) डॉ.श्रीपाल सबनीस
उत्तर : फादर फ्रान्सीस दीब्रिटो

21) कवी कुसुमाग्रज यांनी जीवनलहरी या मात्रा वृत्ताची रचना करताना सहा मात्रांच्या एका गटाला ……………… असे नाव दिले ?
a) प्रभा
b) भृंग
c) करनी
d) मुद्रिक
उत्तर : भृंग

22) खालीलपैकी कोणता शब्द सर्वनाम आहे ?
a) सह्याद्री
b) त्यांनी
c) फटफटले
d) गातो
उत्तर : त्यांनी

23) खालीलपैकी “ओश्ठ्य” व्यंजन कोणते ?
a) प
b) ख
c) ड
d) थ
उत्तर : प

24) 8 सप्टेंबर 2016 रोजी अमलात आलेली 101 वी घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे ?
a) काळ्या पैशास प्रतिबंध
b) वस्तू व सेवा कर
c) जनधन खाते
d) नोटबंदी
उत्तर : वस्तू व सेवा कर

25) मराठी व्याकरणात एकच शब्द वाक्यात दोन अर्थाने वापरल्यामुळे शब्द चमत्कृती साधते तेव्हा ………………… हा अलंकार होतो ?
a) अनुप्रास अलंकार
b) श्लेष अलंकार
c) उपमा अलंकार
d) उत्प्रेक्षा अलंकार
उत्तर : श्लेष अलंकार

 

 


पोलीस भरती 2023 ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 25 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या पोलीस भरती 2023 मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावासाठी NaukriInsider.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. या प्रश्नसंच मध्ये  नवी मुंबई शिपाई पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले सामान्य ज्ञान प्रश्न आपण या संचामध्ये घेत आहोत.

Police Bharti Important Questions
Maharashtra police exam test series
maharashtra police bharti 2023 question papers
पोलीस भरती व इतर सरळसेवा परीक्षेला विचारलेले महत्त्वाचे प्रश्न
नवी मुंबई पोलीस शिपाई भरती 2021 मधील प्रश्नपत्रिका

 

Share this Article
Leave a comment