Vanrakshak Bharti IMP Questions 2023
महापरीक्षा पोर्टल वनरक्षक प्रश्नपत्रिका संच
या प्रश्नसंचामध्ये आपण वनरक्षक भरती पेपर (Vanrakshak Bharti IMP Questions 2023)
दिनांक 25/06/2019 ला विचारण्यात आलेले सामान्यज्ञानचे 40 प्रश्न पाहत आहोत.
1. रामसर करा खालीलपैकी कोणत्या परिसंस्थांच्या संवर्धनाशी निगडित आहे ?
1) सागरी परिसंस्था
2) खारफुटी वने
3) प्रवाळ भित्तिका
4) दलदली/पाणथळ प्रदेश
उत्तर : दलदली/पाणथळ प्रदेश
2. अनर्थ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा .
1) कळ
2) अनिष्ट
3) व्यर्थ
4) अमाप
उत्तर : अनिष्ट
3. महाराष्ट्रात सर्वात जास्त वन्यजीवन अभयारण्य खालीलपैकी कोणत्या विभागात आहेत ?
1) मराठवाडा
2) विदर्भ
3) खानदेश
4) कोकण
उत्तर : विदर्भ
4. भारताच्या संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाच्या रचनेचा अवलंब कधी केला होता ?
1) 15 ऑगस्ट 1947
2) 22 जुलै 1947
3) 26 जानेवारी 1950
4) 2 ऑक्टोबर 1948
उत्तर : 22 जुलै 1947
5. भारतामध्ये लायन टेल्ट वानर कोणत्या ठिकाणी आढळते ?
1) कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान
2) पूर्व घाट
3) गुंडी राष्ट्रीय उद्यान
4) पश्चिम घाट
उत्तर : पश्चिम घाट
6. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. या वाक्याचा काळ ओळखा.
1) पूर्ण वर्तमान काळ
2) पूर्ण भूतकाळ
3) साधा वर्तमान काळ
4) साधा भूतकाळ
उत्तर : साधा भूतकाळ
7. भारतात खारफुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणते राज्यामध्ये आढळते ?
1) महाराष्ट्र
2) केरळ
3) ओडिसा
4) पश्चिम बंगाल
उत्तर : पश्चिम बंगाल
8. ‘काशीत मल्हारी महात्म’ या म्हणीचा योग्य अर्थाचा पर्याय ओळखा.
1) नेहमी परमेश्वराची भक्ती करावी
2) आपला परमेश्वर कधीच सोडू नये
3) सगळीकडे एकसारखेच वागावे
4) नको तिथे नको ती गोष्ट करणे
उत्तर : नको तिथे नको ती गोष्ट करणे
9. भारतातील कोणत्या नद्या ‘रिफ्ट घाटी (व्हॅली) ‘ तून वाहतात ?
1) नर्मदा आणि तापी
2) बियास आणि सतलज
3) गंगा आणि जमुना
4) गोदावरी आणि कावेरी
उत्तर : नर्मदा आणि तापी
१०. भारतात आर्थिक सर्वेक्षण खालीलपैकी कोणा द्वारे प्रकाशित केले जाते ?
1) अर्थ मंत्रालय
2) नियोजन आयोग
3) भारताची रिझर्व बँक
4) भारतीय सांख्यिकी संस्था
उत्तर : अर्थ मंत्रालय
11. ‘भारतीय वन सर्वेक्षण’ चे सेंट्रल झोन कार्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ?
1) नागपूर
2) गडचिरोली
3) ठाणे
4) नाशिक
उत्तर : नागपूर
12. सुप्रसिद्ध ‘अमूल दूध’ उत्पादनाचे मुख्यालय गुजरात मध्ये कोणत्या ठिकाणी आहे ?
1) आनंद
2) सुरत
3) अहमदाबाद
4) मेहसाणा
उत्तर : आनंद
13. ‘मासा’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल ?
1) मख
2) मीन
3) खग
4) तर
उत्तर : मीन
14. ‘गुसाडी’ कोणत्या राज्याचे लोकप्रिय लोकनृत्य आहे ?
1) केरळ
2) तेलंगणा
3) कर्नाटक
4) तामिळनाडू
उत्तर : तेलंगणा
15. ‘ज्ञानेश्वर’ या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखा .
1) ज्ञान + इश्र्वर
2) ज्ञान + ईश्वर
3) ज्ञान + इस्वर
4) ज्ञान + श्वर
उत्तर : ज्ञान + ईश्वर
16. प्रसिद्ध पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहेत ?
1) सेव सायलेंट व्हॅली
2) चिपको आंदोलन
3) नर्मदा बचाव
4) झोला आंदोलन
उत्तर : चिपको आंदोलन
17. खालीलपैकी समानार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा .
1) खुजा – बुटका
2) कौशल्य – खुबी
3) आचरट – लोणचे
4) पारंगत – निपुण
उत्तर : आचरट – लोणचे
१८. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा .
1) बुडणे x तरांगणे
2) अल्प x मित
3) युक्ती x करामत
4) धन x माल
उत्तर : बुडणे x तरांगणे
19. भारतीय जीव जंतु कल्याण बोर्ड याचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ?
1) चेन्नई
2) दिल्ली
3) हैदराबाद
4) पुणे
उत्तर : चेन्नई
20. डिप्रेस्ड क्लासेस मिशन ऑफ इंडिया ……………. यांच्याद्वारे स्थापित झाली होती.
1) विठ्ठल रामजी शिंदे
2) महात्मा ज्योतिबा फुले
3) महर्षी धोंडो केशव कर्वे
4) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
उत्तर : विठ्ठल रामजी शिंदे
21. ‘मुख्याध्यापक ‘ या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखा .
1) मुख्य + आध्यापक
2) मुख्य + अध्यापक
3) मुख्य + धापक
4) मुख्य + ध्यापक
उत्तर : मुख्य + अध्यापक
22. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा .
1) स्वाधीन x पराधीन
2) अनुकूल x प्रतिकूल
3) जाणता x समजदार
4) कृश x स्थूल
उत्तर : जाणता x समजदार
23. खालील शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा .
कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणारा इष्ट बदल –
1) अधोगती
2) वैचारिक क्रांती
3) परिवर्तन
4) उत्क्रांती
उत्तर : उत्क्रांती
24. खालील म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा .
चांदणे चोराला …………….
1) पाऊस मोराला
2) खेळणे पोराला
3) ऊन घुबडाला
4) आश्रम साधूला
उत्तर : ऊन घुबडाला
25. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन करण्यात आला होता ?
1) कोल्हापूर
2) सांगली
3) अहमदनगर
4) पुणे
उत्तर : अहमदनगर
26. खालील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.
जाणून घेण्याची इच्छा असणारा –
1) शुभेच्छुक
2) जिज्ञासू
3) सदिच्छा
4) कामसु
उत्तर : जिज्ञासू
27. दुष्काळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
1) नापीक
2) सुकाळ
3) अकाल
4) पाषाण
उत्तर : सुकाळ
28. समूहदर्शक शब्द ओळखा. जशी पोत्यांची थप्पी तशी नाण्यांची ……………
1) रास
2) जवत
3) चळत
4) पुंजका
उत्तर : चळत
29. शरावती जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ?
1) कर्नाटक
2) हिमाचल प्रदेश
3) मध्य प्रदेश
4) महाराष्ट्र
उत्तर : कर्नाटक
30. संविधान भारतीय नागरिकांना …………… नागरिकत्व देते .
1) एकेरी
2) दुहेरी
3) तिहेरी
4) सांघिक
उत्तर : एकेरी
31. पोक्सो कायदा (POCSO ACT) हा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?
1) लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण
2) बालविवाह निषेध
3) हुंडा प्रतिबंध
4) महिलांचा लैंगिक छळ
उत्तर : लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण
32. आतड्याला पीळ पडणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता होईल ?
1) आतड्याचा रोग होणे
2) आतडे बाहेर येणे
3) पोटातल्या पोटात आतडे पिळले जाणे
4) दयेने कळवळणे
उत्तर : दयेने कळवळणे
33. कोणते राष्ट्रीय उद्यान भरतपुर राजस्थान येथे वसलेले आहे ?
1) कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान
2) केवलादेव राष्ट्रीय उद्यान
3) बांधवगड राष्ट्रीय उद्यान
4) नागरहोल राष्ट्रीय उद्यान
उत्तर : केवलादेव राष्ट्रीय उद्यान
34. खालीलपैकी भारतातील तरंगते राष्ट्रीय उद्यान कोणते आहे ?
1) कैबुल लामजो राष्ट्रीय उद्यान
2) चिल्का सरोवर
3) नल सरोवर
4) केवलदेव घाना
उत्तर : कैबुल लामजो राष्ट्रीय उद्यान
35. कोणत्या शहरात अलकनंदा व भागीरथी नद्या एकत्र येऊन गंगा नदीत रूपांतरित होतात ?
1) देवप्रयाग
2) हरिद्वार
3) ऋषिकेश
4) रुद्रप्रयाग
उत्तर : देवप्रयाग
36. भारतातील 4G सेवा प्रदान करणारी प्रथम भारतीय दूरसंचार कंपनी कोणती होती ?
1) एअरटेल
2) टाटा इंडिकॉम
3) बीएसएनएल
4) एअरसेल
उत्तर : एअरटेल
37. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधील पर्यावरणाचा अभ्यास करण्याचे कार्य गाडगीळ समितीत होते ?
1) सिंधुदुर्ग व रत्नागिरी
2) हिंगोली व भंडारा
3) यवतमाळ व अकोला
4) लातूर व वर्धा
उत्तर : सिंधुदुर्ग व रत्नागिरी
38. …………….. यांच्या स्मृतीमध्ये राष्ट्रीय युवा दिवस साजरा केला जातो .
1) जवाहरलाल नेहरू
2) सुभाषचंद्र बोस
3) स्वामी विवेकानंद
4) महात्मा गांधी
उत्तर : स्वामी विवेकानंद
39. मानव आणि जीवावरण राखीव क्षेत्र हा कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या जागतिक संघटनेने सुरू केला ?
1) युनेस्को
2) इंडियन बोर्ड फॉर वाईल्ड
3) लाईफ वर्ल्ड फंड
4) IUCN
उत्तर : युनेस्को
40. मसुदा समिती समोर भारताची उद्देशिका (PREAMBLE) खालीलपैकी कोणी मांडली ?
1) जवाहरलाल नेहरू
2) महात्मा गांधी
3)कृष्ण सिन्हा
4) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
उत्तर : जवाहरलाल नेहरू
वनरक्षक भरतीसाठी 2019 मध्ये विचारण्यात आलेले महत्वाचे प्रश्नोत्तरे
Vanrakshak Bharti IMP Questions 2023 || Vanrashak Bharti Question Paper Analysis || वनरक्षक भरती 2023 प्रश्नसंच 01
Very nice and helpful
Best 👍
Best👍👍👍🙏