ZP Exam Bharti Important Questions Papers 2023 : जिल्हा परिषद भरती 2023
जिल्हा परिषद भरती 2023 ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 30 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या पोलीस भरती 2023 मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावासाठी NaukriInsider.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे.
प्रश्न १ : भारतीय नौदलाचे जनक असे कोणाला म्हटले जाते ?
१) टिपू सुलतान
२) बाजीराव पेशवा
३) अदिलशाहा
४) छ.शिवाजी महाराज
उत्तर : छ.शिवाजी महाराज
प्रश्न २ : मंगल पांडे यांनी ……….. येथील छावणीतील इंग्रज अधिकार्यावर गोळी झाडली ?
१) बराकपुर
२) कानपूर
३) जैनपुर
४) मेरठ
उत्तर : बराकपुर
प्रश्न ३ : ……….. यांनी ‘स्त्री-पुरुष तुलना’ हा ग्रंथ लिहिला आहे ?
१) पंडिता रमाबाई
२) ताराबाई शिंदे
३) सवित्रिबाई फुले
४) रमाबाई रानडे
उत्तर : ताराबाई शिंदे
प्रश्न ४ : बाबू गेनू हे सत्याग्रही कोणत्या ठिकाणी शहीद झाले होते ?
१) ठाणे
२) मुंबई
३) पुणे
४) धुळे
उत्तर : मुंबई
प्रश्न ५ : अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी ………… ह्या नाशिकच्या कलेक्टरचा वध केला ?
१) जॅक्सन
२) रॅंड
३) वॉटसन
४) डायर
उत्तर : जॅक्सन
प्रश्न ६ : मुंबई उच्च न्यायालयाचे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी खंडपीठ आहे ?
१) ठाणे
२) नाशिक
३) सातारा
४) पणजी
उत्तर : पणजी
प्रश्न ७ : 17 जून 1948 रोजी घोषित करण्यात आलेल्या ‘भाषावार प्रांतरचना आयोगाचे’ अध्यक्ष कोण होते ?
१) एस.के. पाटील
२) न्या. एस.के. दार
३) ब्रिजलाल बियाणी
४) काकासाहेब गाडगिळ
उत्तर : न्या. एस.के. दार
प्रश्न ८ : भारताच्या एकत्रित निधीतून खर्च करण्यासाठी कोणाची संमती आवश्यक असते ?
१) राष्ट्रपती
२) पंतप्रधान
३) संसदेच्या दोन्ही गृहांची
४) आर.बी.आय गव्हर्नर
उत्तर : संसदेच्या दोन्ही गृहांची
प्रश्न ९ : महाराष्ट्राचे अर्थमंत्री महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधानसभेत कोणाच्या वतीने सादर करतात ?
१) मुख्यमंत्री
२) राज्यपाल
३) उपमुख्यमंत्री
४) गृहमंत्री
उत्तर : राज्यपाल
प्रश्न १० : मूलभूत अधिकारांचा समावेश घटनेच्या कोणत्या भागात (प्रकरण) केला आहे ?
१) भाग 2
२) भाग 4
३) भाग 5
४) भाग 3
उत्तर : भाग 3
प्रश्न ११ : खालीलपैकी कोणत्या दुग्धजन्य पदार्थात स्ंनिग्धाचे प्रमाण सर्वाधिक असते ?
१) खवा
२) तूप
३) श्रीखंड
४) आईस्क्रीम
उत्तर : तूप
प्रश्न १२ : मानवी मनाचा अभ्यास करणार्या शास्त्राला काय म्हणतात ?
१) क्रिमीनॉलॉजी
२) सायकॉलॉजी
३) फिजीऑलॉजी
४) न्यूरॉलॉजी
उत्तर : सायकॉलॉजी
प्रश्न १३ : रिव्होल्व्हर चा शोध खालीलपैकी कोणी लावला ?
१) ऑटोझन
२) रिचर्ड गॅटलिंग
३) सॅम्युअल कोल्ट
४) डेनीस पॅपिन
उत्तर : सॅम्युअल कोल्ट
प्रश्न १४ : शोभेची दारू तयार करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात ?
१) फॉस्फरस
२) सल्फर
३) कॉपर
४) ग्रॅफाईड
उत्तर : फॉस्फरस
प्रश्न १५ : ‘महिको’ या कृषि संस्थेचे संशोधन केंद्र या जिल्ह्यात आहे ?
१) धुळे
२) अहमदनगर
३) जालना
४) नागपुर
उत्तर : जालना
प्रश्न १६ : बल्लारपुर हे ………… नदीच्या खोर्यातील महत्त्वाचे कोळसा क्षेत्र आहे ?
१) वैनगंगा
२) प्राणहीता
३) वर्धा
४) पैनगंगा
उत्तर : वर्धा
प्रश्न १७ : मिठागरांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते ?
१) मुंबई
२) रायगड
३) सिंधुदुर्ग
४) ठाणे
उत्तर : रायगड
प्रश्न १८ : कार्बन टॅक्स (कार्बन कार) लागू करणारा पहिला देश कोणता आहे ?
१) भारत
२) जपान
३) डेन्मार्क
४) न्यूझीलँड
उत्तर : न्यूझीलँड
प्रश्न १९ : दलाई लामा यांना नुकतेच कोणत्या देशाने नागरिकत्त्व बहाल केले आहे ?
१) जर्मनी
२) चीन
३) इटली
४) ब्रिटन
उत्तर : इटली
प्रश्न २० : जगातील पहिली हायड्रोजन रेल्वे कोणत्या देशात सुरू झाली आहे ?
१) चीन
२) जपान
३) फ्रान्स
४) जर्मनी
उत्तर : जर्मनी
प्रश्न २१ : अटाकामा वाळवंट खालीलपैकी कोणत्या खंडात पसरलेले आहे ?
१) आशिया
२) आफ्रिका
३) दक्षिण अमेरिका
४) उत्तर अमेरिका
उत्तर : दक्षिण अमेरिका
प्रश्न २२ : खालीलपैकी कोणास भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाते ?
१) दादासाहेब फाळके
२) अमिताभ बच्चन
३) देविका राणी
४) दिलीप कुमार
उत्तर : दादासाहेब फाळके
प्रश्न २३ : बायचिंग भूतीया हा खेळाडू कोणत्या खेळशी संबंधित आहे ?
१) हँडबॉल
२) फुटबॉल
३) व्होलीबॉल
४) क्रिकेट
उत्तर : फुटबॉल
प्रश्न २४ : मालगुडी डेज या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
१) व.पू.काळे
२) पु.ल. देशपांडे
३) मंगेश पाडगावकर
४) आर.के. नारायण
उत्तर : आर.के. नारायण
प्रश्न २६ : खालीलपैकी कोणते कोसोवो देशाचे राजधानी शहर आहे ?
१) स्कोप्जे
२) प्रिस्टीना
३) पॉडगोरिका
४) सराजेव्हो
उत्तर : प्रिस्टीना
प्रश्न २७ : कोणत्या शहरात ‘संयुक्त राष्ट्रसंघ अन्न प्रणाली शिखर परिषद 2021’ आयोजित करण्यात आली ?
१) न्युयॉर्क
२) मुंबई
३) ब्युनस आयर्स
४) मनिला
उत्तर : न्युयॉर्क
प्रश्न २८ : 25 सप्टेंबर 2021 रोजी ‘सौभाग्य’ योजनेला किती वर्षे पूर्ण झाले ?
१) 5 वर्षे
२) 6 वर्षे
३) 3 वर्षे
४) 4 वर्षे
उत्तर : 4 वर्षे
प्रश्न २९ : खालीलपैकी कोणत्या देशात ‘कून पर्वत’ आहे ?
१) भारत
२) स्वित्झर्लंड
३) चीन
४) जपान
उत्तर : भारत
प्रश्न ३० : कोणत्या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय शांती दिवस’ साजरा केला जातो ?
१) 20 सप्टेंबर
२) 21 सप्टेंबर
३) 19 सप्टेंबर
४) 18 सप्टेंबर
उत्तर : 21 सप्टेंबर
https://www.youtube.com/watch?v=xSKYbl6W-DM
हा प्रश्नसंच जिल्हा परिषद विभागाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरणार आहे,तसेच यातील सर्व प्रश्न मागील वर्षीच्या जिल्हा परिषद विभागाच्या परीक्षेसाठी विचारण्यात आलेले आहेत.
D
जिल्हा परिषद भरती स्पर्धा परीक्षेची तयारी करताना आहे का बर आहे सर मला स्पर्धा परीक्षेची माहिती सांगा की